Ad will apear here
Next
नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांची जव्हार तालुका भेट
जव्हार (पालघर) : नियोजन विभागाचे प्रधान सचिव अपूर्वा चंद्रा यांनी सहा जुलै रोजी पालघर जिल्ह्याच्या जव्हार तालुक्यातील स्वयंसहायता गटांना, ग्रामसंघांना व विविध उपजीविका कार्यक्रमांना भेट दिली. ‘उमेद’ या राज्य सरकारच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत हे स्वयंसहायता गट स्थापन करण्यात आले आहेत. 

मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, वर्ल्ड बँकेच्या सल्लागार मेघना फणसळकर, ‘एमएसआरएलएम’चे उपसंचालक रघुवीर सोमवंशी, पालघर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक घाणेकर, ‘जीवनोन्नती’चे योजेश भामरे, एचआर मॅनेजर रामदास धुमाळ, जव्हारचे गटविकास अधिकारी पठारे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.

राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत स्वयंसहायता गटांना जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून कृषी अवजारे देण्यात येतात. या योजनेची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी ग्रामस्थांना दिली. तसेच या वेळी शिरोशी येथे त्यांच्या हस्ते मोगऱ्याचे रोप लावण्यात आले.

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZPABE
Similar Posts
‘२०१९पर्यंत ग्रामीण भागातील बेघर कुटुंबांना घर देणार’ मुंबई : ‘जनधन योजनेच्या माध्यमातून मोठे काम हाती घेण्यात आले असून, गरिब, आदिवासी लोकांना बँकेच्या कक्षेत आणण्याचे काम आपल्या पंतप्रधानांनी केले; तसेच ज्यांना घर नाही अशा १२ लाख कुटुंबांपैकी चार लाख कुटुंबांना घर देण्यात आले आहे. २०१९पर्यंत ग्रामीण भागातील प्रत्येक बेघर कुटुंबाला घर दिले जाईल,’ असे आश्वासन मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी दिले
कुपोषण निर्मूलनाबाबत कीर्तनकारांची कार्यशाळा वाडा (पालघर) : ‘एकात्मिक बालविकास प्रकल्प वाडा दोन’ यांच्यामार्फत वाडा तालुक्यातील ६० कीर्तनकार/ प्रवचनकार यांची कुपोषण निर्मूलनाबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेला पालघर जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी, पंचायत समिती सभापती नडगे मॅडम, उपसभापती पाटील. जिल्हा परिषद सदस्य
हत्तीरोगविरोधी एकदिवसीय औषधोपचार मोहिमेबाबत समन्वय समितीची बैठक पालघर : हत्तीरोग निर्मूलनासाठी महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांमध्ये सामुदायिक औषधोपचार मोहीम २६ जुलै ते ३० जुलै या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालघर येथे २० जुलै रोजी जिल्हा समन्वय समितीची बैठक मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्यामार्फत घेण्यात आली. यात या मोहिमेतील नियोजनाचा आढावा घेण्यात आला
पालघर जिल्हा परिषदेत कॉफी विथ सीईओ पालघर : पालघर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांच्या दालनात ‘कॉफी विथ सीईओ’ हा कार्यक्रम नुकताच झाला. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ग्रामपंचायतींना हागणदारीमुक्त करण्यात सहकार्य करणाऱ्या व उलेखनीय कार्य करणाऱ्यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या हस्ते या कार्यक्रमांतर्गत मेडल देऊन गौरविण्यात येते

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language